नवं -वधूसाठी नवीन उखाणे | nav-vadhusathi navin ukhane

Spread the love

नवं -वधूसाठी नवीन उखाणे…

37,600+ Wedding Couple Hands Stock Photos, Pictures ...

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,

… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद

 

कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,

…राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती

 

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,

… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला

 

मंदिरात वाहते, फुल आणि पान,

… रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान

 

लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,

…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती

 

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,

…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

 

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,

.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल

 

कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,

… रावांचे नांव घेते, सारे जण बसा

 

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,

… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा

 

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने

 

पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,

… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे

 

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,

… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती

 

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,

.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

 

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,

… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला

 

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,

… रावांच नांव घेताना, कसला आला आळस

 

पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,

… रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते

 

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,

… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

 

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,

… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा

 

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,

… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार

 

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,

… राव हेच माझे अलंकार खरे

 

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,

आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी

 

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,

… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान

 

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,

…चे नाव घेते तुमच्या साठी!

 

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,

… रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन

 

घातली मी वरमाला हसले… राव गाली,

थरथरला माझा हात लाजेने चढली लाली

 

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,

घडविले दैवांनी… रावांना जीव लावून

 

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,

… रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत

 

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,

… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार

 

पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं,

…रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन

 

चांदीचे जोडवे पतीची खूण,

.. रावांचे नांव घेते,… ची सून

 

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,

… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे

 

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,

… रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले

 

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,

… रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा

 

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,

…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

 

स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी,

…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी

 

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,

त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा

 

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,

…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले

 

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,

… रावांचे हेच रूप मला फार आवडले

 

मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,

…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा

 

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन,

…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन

 

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,

…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची

 

चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,

…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती

 

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,

… रावांचा स्वभाव आहे फारच उदार

 

करवंदाची साल चंदनाचे खोड,

… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

 

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,

… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले

 

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,

…रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

 

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,

…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात

 

शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,

आता ….राव माझे जीवनसाथी

 

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,

…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

30k+ Wedding Hand Pictures | Download Free Images on Unsplash

सुंदर उखाणे

नवे नवे जोडपे ,आशीर्वादासाठी वाकले -रावांसोबात ,मी सासरी पाऊल टाकले .

बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध —-रावांसाठी सोडले माहेर ,तरी तुटत नाही रुंनांबंध.

सासरचे निरांजन ,माहेरची फूलवात —रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात .

काढ्यात काढा पाटणकर काढा —-रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा .

हातात घातल्या बांगड्या ,गळ्यात घातली ठुशी —-रावांचे नाव घेते गृहप्रवेशा दिवशी .

नाव घ्या नाव घ्या म्हणतात सगळे ,नाव तरी काय घेयचे ——रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

नाव घ्या नाव घ्या म्हणतात सारे —–रावांचे नाव घेयला उखाणा कशाला हवा .

पार्वती ने केला पन महादेवालाच वरिण ——रावांच्या साथीने आदर्श संसार करीन.

बारीक मणी घरभर पसरले—-रावांसाठी सोडले मी माहेर

वर्षाऋतुत वरुण राजाने केली बरसात —–रावांचे नाव घेण्यास केली मी आजपासून सुरवात

गोकुळच्या कुंजवणात श्रीकृष्ण वाजवतो बासुरी —–रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी .

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालचे पडते प्रतिबिंब —-चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब .

कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून —चे नाव घ्यायला केली सुरुवात आजपासून .

इंग्रजीत चंद्रला म्हणतात मून —-रावांचे नाव घेते —- पाटलाची सून

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी —-रावांचे नाव घेते लग्नदिवशी

संध्याकाळच्या वेळी सूर्यला चढली लाली —-रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली .

परसात अंगण ,अंगणात तुळस —-रावांचे नाव घेयला मला नाही आळस

वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस ,कधी पुनव कधी अमावस —-रावांचे नाव घेते आज आहे वट्पोर्णिमेचा दिवस

गोकुळा सारखे सासर ,सारे आहेत हौशी —-रावांचे नाव घेते मकरसंक्रांती दिवशी

बनारसी शालूला आहेत जरतारी काठ —-रावांचे च्या मुलीच्या बरश्याचा केलाय मोठा थाट

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे —–रावांचे नाव घेते सत्यनारायना पुढे

गोर्‍या गोर्‍या हातावर रेखाटली मेंदी —–रावांचे नाव घेणयची यावी वारंवार संधि

लग्नात लागली प्रेमाची चाहूल —–रावांच्या जीवनात टाकते मी पहिलं पाऊल

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल —–रावांचे नाव घेते तूमच्या साथी स्पेशल

जन्म दिला मातेने ,पालन केले पित्याने —–रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

शेल्या शेल्या ची बांधली गाठ —–नाव आहे माला तोंडपाठ

संसार रूपी सागरात पतिपत्नीची नौका —–नाव घेते सर्वजन ऐका

मोह नाही माया नाही ,नाही मत्सर हेवा ,—-चे नाव घेते नीट लक्ष ठेवा

गळ्यात मंगळसूत्र ,मंगळसुत्रात डोरले —-रावांचे नाव मी हृदयात कोरले

रुपेरी सागरावर चंदेरी लाट —–रावांचे नाव घेते सोडा माझी वाट

सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले —- रावांचे नाव घेण्यासाठी सगळ्यानी अडवले

सूर चांगला असेल तर गाण्यास येते गोडी—— रावां मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी

हाता वरच्या मेहंदी ला रंग चढला छान—- रावांचे नाव घेते राखून तुमचा मान.

राजा राणी चा संसाराचा प्रवासआहे नवा , अन—- रावांचे नाव घेयला उखाणा कशाला हवा.

मंगळसुत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माहेर—– रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

 

वाटी सारताना घ्यावयाची उखाणे

श्रावण महिन्यात सण, उत्सवाची पर्वणी
………चं नाव घेते मी वाती सारण्याचा कारणी.

स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,
………..चं नाव घेते वाती सारण्याच्या वेळी.

सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
………चं नाव घेऊन मी वाती सारते.

वेलीला शोभे फूल, स्त्रिला शोभे अपत्य,
………चं नाव घ्यायला वाती सारण्याचं निमित्त.

लक्ष्मी दानात शोभते, विद्या विनयेन शोभते,
……….चं नाव घेऊन मी वाती सारते.

क्षणाची विदयुलता ब्रम्हांड उजळी,
……..चं नाव घेते वाती सारण्याच्या वेळी.

बागेतील फूल पूजेसाठी तोडते,
……… नाव घेऊन वाती सारते.

 

समईतील ज्योती भक्ती-भावाने उजळविते,
……… नाव घेऊन वाती सारते.

समईत लावल्या वाती, उजळल्या ज्योती,
………… नाव घेऊन सारते वाती.

चंद्रोदय होताच संकष्टीला करतात गणेशाची आरती,
……….. चं नाव घेऊन सारते वाती.

दसऱ्याला आपट्याचे पान, हृदय मिलन दर्शविते,
………. चं नाव घेऊन वाती सारते.

आई-वडिलांनी जन्म दिला, ब्रह्मदेवानी बांधल्या गाठी,
……… चं नाव घेते वाती सारण्यासाठी.

महाविष्णूची लक्ष्मी, नीलकंठाची पार्वती,
……… चे नाव घेऊन सारते वाती.

 

  इंगजी उखाणे…. 

 

फोर प्लस फाइव

इज इक्वल टू नाइन

माय मिस्टर,

………. इज व्हेरी व्हेरी फाइन.

वुलन कोट गोल्डन रिंग,

……… माय डिअर किंग.

बन बदर टू सिस्टर,

……….. इज माय मिस्टर.

इंडिया इज माय कंट्री

ऑल इंडियन आर

माय ब्रदर अँड सिस्टर,

……….. इज माय मिस्टर.

 

 

ग्रास इज ग्रीन, माय मिस्टर,

……. इज व्हेरी फाइन.

क्रिकेट इज ब्यूटीफूल गेम,

……….. इज माय मिस्टर्स नेम.

वन बॉटल फोर ग्लास,

……….. इज फसक्लास.

600+ Indian Bride With Mehandi In Hand Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

फुकडीचे उखाणे …..

 

सोन्याचा हार मोत्यानी भरा,
फुगड्या खेळा याला प्रारंभ करा.

मामाने दिली सोन्याची बुगडी,

तुझी न माझी पहिलीच फुगडी.

आपण दोघी मैत्रीणी जोडीच्या,

हातात पाटल्या तोडीच्या.

तुझी माझी फुगडी गिरकेदार,

मैत्रीणींना आवडते फार.

साता समुद्रापलीकडे रामाने घेतली अळी,

माझी मैत्रीण गुलाबाची कळी.

मंगळागौरीला वाहिला केवडा,

फुगडी घालून झाली वाट माझी सोडा..

 

आंबाडीची भाजी आंबली कशी, आंबली कशी,

माझी मैत्रीण दमली कशी.

गीतात जसा भाव, फुलात तसा गंध,

मैत्रिणी बरोबर जुळले फुगडी बंध.

 

वधू-वराची गाठ मारताना / सोडताना घ्यावयाची उखाणे ….

 

विवाहाच्या सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट,
…… च नाव घेऊन बांधते वधू-वराची गाठ.

नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,
…… च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी.

श्रीकृष्ण बसले जेवायला, चांदीचा टाकते पाट,
….. च नाव घेऊन बांधते वधू-वराची गाठ.

विठ्ठलाच्या देवळात भक्ताची दाटी,
…… च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी.

हिरव्या साडीला जरीचे काठ,
…… नाव घेऊन सोडते वधू-वराची गाठ.

रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,
….. च नाव घेऊन सोडते….. च्या गाठी.

नाटकात नाटक गाजलं सुभद्राहरण,
…… च नाव घ्यायला गाठ मारण्याचं कारण.

गोकुळाष्टमीला घरोघरी कृष्णजन्माचा थाट,
…… च नाव घेऊन सोडते वधू-वराची गाठ.

श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरतात ओटी,
….. च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी.

श्रावण महिन्यात सण उत्सवाचे पर्वणी,
….. रावांचं नाव घेते गाठ मारण्याच्या कारणी.

श्री वर्धनी सुपारी अडकित्त्याने फोडते,
….. नाव घेऊन….. ची गाठ बांधते.

 

मुंडावळी सोडताना घ्यावयाची उखाणे …

 

सीतेच्या पर्णकुटी समोर लावल्या केळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

घरासमोर अंगण अंगणात लावली केळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

घरापुढे अंगण, अंगणात काढली रांगोळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

केळीच्या पानावर केशरी भात,

…… च नाव घेऊन लावते मुंडावळी ला हात.

 

 

स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

हिंद मातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

उंबरठ्यावरचे माप पदस्पर्शाने लवांडते,

…… च नाव घेऊन मुंडावळी सोडते.

 

 

सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवते,

….. च नाव घेऊन मुंडावळी सोडते.

 

सीतेच्या पर्णकुटी समोर लावल्या केळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

घरासमोर अंगण अंगणात लावली केळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

घरापुढे अंगण, अंगणात काढली रांगोळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

केळीच्या पानावर केशरी भात,

…… च नाव घेऊन लावते मुंडावळी ला हात.

 

 

स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

हिंद मातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी,

…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

 

 

उंबरठ्यावरचे माप पदस्पर्शाने लवांडते,

…… च नाव घेऊन मुंडावळी सोडते.

 

 

सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवते,

….. च नाव घेऊन मुंडावळी सोडते.

 

 

नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,

….. च नाव घेते मुंडावळी सोडण्यासाठी.

 

सुपारी सोडतानाची उखाणे….

 

श्यमसावळा कृष्णसखा भक्तांचा कैवारी,

…… च नाव घेऊन सोडते सुपारी.

 

 

मराठ्यांच्या मुलखात भवानी ची वारी,

…… च नाव घेऊन सोडते सुपारी.

 

 

महादेवाच्या मंदिरात पूजा करते दुपारी,

….. च नाव घेऊन सोडते सुपारी.

 

 

एकादशीला करतात भक्त पंढरीची वारी,

…… च नाव घेऊन सोडते सुपारी.

 

 

अंगणात शोभे तुळस, तोरण शोभे दारी,

….. च नाव घेऊन सोडते सुपारी.

 

 

यमुनेच्या काठावर श्रीकृष्ण वाजवी बासरी,

….. च नाव घेऊन सोडते सुपारी.

 

 

महादेवाच्या मंदिरात वाजतात नगारे,

…… च नाव घेऊन मोडते ढिगारे.

 

 

प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,

….. च नाव घेऊन ढिगारे मोडते .

 

 

मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते,

…..  च नाव घेऊन ढिगारे मोडते.

 

 

विठ्ठलाच्या देवळात भक्ताची दाटी,

….. च नाव घेऊन देणारे मोडण्यासाठी.

 

 

स्टीलच्या ताटात ठेवले फणसाचे गरे,

….. च  नाव घेऊन मोडते ढिगारे.

 

 

नवमी दिवशी राम जन्मले दुपारी,

….. नाव घेऊन सोडते सुपारी

How to Grow Emotional Intimacy in Your Marriage

घास भरवतानाचे उखाणे…

 

आनंदाने भरला हा दिन लग्नाचा,

…… ना घास देते गोड जिलेबीचा.

 

 

सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास,

…… ना देते….. चा घास.

 

 

चांदीच्या तबकात पकवणाची रास,

….. ना देते….. चा घास.

 

 

रंगीबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते,

…… चा घास….. ना देते.

 

 

दया, क्षमा, शांती तेथे लक्ष्मीचा वास,

….. ना भरवते….. चा घास.

 

 

लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास,

…… घालते…… चा घास.

 

 

महादेवाच्या मंदिरात उदबत्तीचा वास,

…… ना भरवते….. चा घास.

 

 

गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा,

…… ना घास भरवते….. चा.

 

 

शरयू नदीत जन्म झाला मेघदूताचा,

….. ना घास घालते….. चा.

 

 

संसाराच्या सुख स्वप्नाची स्त्रीच्या मनी आस,

…… ना घालते…… चा घास.

 

काकन बांधताना सोडताना घ्यावयाची उखाणे…

 

आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण,

…… च नाव घेऊन बांधते कंकन.

 

 

पाण्याच्या हंड्यावर फुलाचे झाकण,

….. च नाव घेऊन बांधते कंकन.

 

 

वसंत ऋतूत कोकिळा करते कुंजन,

….. च नाव घेऊन बांधते कंकन.

 

 

चंद्राभोवती तारकांनी धरलं गोल रिंगण,

…… च नाव घेऊन बांधते कंकन .

 

 

राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन,

…… च नाव घेऊन बांधते कंकन.

 

 

चांदीच्या करड्याला सोन्याचे झाकण

…… च नाव घेऊन बांधते कंकन.

 

 

अमृतासाठी देव-दानवांनी समुद्राचे केले मंथन,

….. च नाव घेऊन बांधते कंकन.

 

 

माहेरच्या विद्यालयात वेचले ज्ञानाचे कण,

….. च नाव घेऊन बांधते कंकन.

 

 

स्वराज्यासाठी शिवरायांनी अर्पिले तन-मन-धन,

….. च नाव घेऊन बांधते कंकन.

 

 गृहप्रवेश वेळी घ्यावयाची उखाणे…

 

उंबरठ्यावरचे माप, पदस्पर्शाने लवंडते,

…… पत्नी म्हणून गृहप्रवेश करते.

 

उंबरठ्यावर पाय देताच लागली सुखी जीवनाची चाहूल,

…… च नाव घेऊन टाकते घरात पाऊल.

 

सुखाच्या पायर्‍या चढताना नाही दुःखाचा लवलेश,

….. च नाव घेऊन करते गृहप्रवेश.

 

लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विनयाने विद्या शोभते,

…… बरोबर गृहप्रवेश करते.

 

मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते,

…… च नाव घेऊन ग्रह प्रवेश करते.

 

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,

…… च नाव घेऊन गृहप्रवेश करते.

 

प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,

….. च नाव घेऊन गृहप्रवेश करते.

 

अज्ञातवासात राहण्यासाठी पांडवांनी बदलली वेश,

…… च नाव घेऊन करते गृहप्रवेश.

 

तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला करते नवस,

…… चं नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळेस.

 

नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,

…… च नाव घेते गृहप्रवेशासाठी.

 

रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,

…… च नाव घेते गृहप्रवेशासाठी.

 

साता समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ,

…… चं नाव घेते गृहप्रवेशाची वेळ.

 

गांधींनीम्हंटले “चाले जाव”, गोरजेला पळून ।

……… पंतांचेनाव घेते , सगळी पहा वळून ।।

 

आपल्या मुलुखातच व्हायचा आपल्या भाषेचा मान ।

. . . . . . . . . .रावांचेनाव घेते, ऎका देऊन कान ।।

 

…….. लॉज मध्ये राहू, अन राईस-प्लेटखाऊ ।।

. . . . . . . . . .. . .. रावमला संगे न्या, माहेरी किती राहू ।।

 

क्यूनको, कार्डनको,नको कापड-कोटा ।।

…….. …… पंतांच्या शेतीवाडीत, नाही कशाला तोटा ।।

 

गिरिजाशंकर, सीता-राम यांना गुरु करू ।

. .. . . .. . .. . रावआपण दोघे, संसारसागर तरु ।।

 

बापू गेले सांगून, ‘विसरा जात पात’ ।

…….. रावांशीलग्न केले जरी भिन्न जात ।।

 

हिमालयाच्या मुलीनेही म्हातारा नवरा केला ।।

….. पंत बीजवर तरी , संसार सुखाचा झाला ।।

 

उभी होते मळ्यात, नजर गेली तळ्यात ।

हजारांची कंठी . . . . . . . .. .. . . रावांच्या गळ्यात ।।

 

रुपयाची डबी, त्यात अत्तराचा बोला ।

. . . . . . .. .. . रावांचे बोलणे शंभर रुपये तोळा ।।

 

उशाखालचा शेला, पायाखाली गेला ।

उठाउठा   . . . . . . .. . . . पंत, प्रहरभर दिवस आला ।

 

मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला ।

. . . . .. . . . . .. . रावांचेआयुष्य वाढो, हीच प्रार्थना तुला ।।

 

लावीत होते कुंकू, त्यात पडले मोती ।

. . . . . . . . .. . . .पंतासारखा भ्रतारजन्मोजल्मी चिंता ।।

 

कुरूंदाची सहाण, चंदनाचे खोड ।

. . . . . . . . . रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड ।।

 

चंद्राचाझाला उदय , सागराला अली भरती ।

. . . . . . . . . . .. पंतांच्याहृदयात . . . . . देवाचीमूर्ती ।।

 

शिवाजीसारख्या पुत्र, जिजाईसारखी माता ।

. . . . . . .. . . . रावांचेनाव घेते सर्वांच्याकरिता ।।

 

महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू ।

. . .. .. .. . . . चे नाव घेऊन हिंदमातेचा जयघोष करू ।।

 

कॅप्टन लक्ष्मी, नेताजी सुभाषचंद्र बोस ।

. . . . . . . . .चे नाव घेऊन’जय हिंद’ चा करू जयघोष।।

 

बाळ्या बुगड्या गेल्या, अन इयरिंग आले।

कॅप्टन . . . . . .. . . रावांच्याहुकुमाने सैनिक दल चाले ।।

 

स्फोटाने फुटली बोट , त्याने उडाल्या लगडी ।

. . . . . . .. . . रावांच्या डोक्यावर शिंदेशाही पगडी ।।

 

आधी घातला चंद्रहार, मग घातली ठुशी।

…….. . रावांचे नाव घ्यायला माझी नेहमीच ख़ुशी।।

 

दसऱ्याच्या सणाला केला साखर-भात ।

. . . . . . . . . . रावांचे नाव घेते . . . . . . .पंतांची नात ।।

 

पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर।

. . . .. . . . रावांच्यासेवेला . . . . . . नेहमीचहजर ।।

 

एक पाय घरात, एक पाय दारात ।

जडावाचे पदक . . . . . . . . रावांच्या हारात ।।

 

लहानशा भिंती , चित्रे काढू किती ।

सासूबाईंच्यापोटी . . . . . . . . . राव मोती ।।

 

सागवानी पेटीला सोन्याची चूक ।

. . . . . . .. . रावांच्या हातात कायद्यांचे बुक ।।

 

शिसवी लाकडाचा देव्हारा , त्यात चांदीची मूर्ती ।

. . . . … . . . रावांचीदेशभक्ती म्हणून सदा कीर्ती ।।

 

काळी  चंद्रकळातिला मोतीचूर पदर ।

. . . . . . . . रावांच्याजीवावर कुंकवाचा गजर ।।

 

चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा ।

. . . . . . . . . पंतांच्या जिवावर . . .. ..  . मारीमौजा ।।

 

देवापुढे लावला उद , वास सुटला छान ।

. . . . . . .  पंतांचेनाव घेते , ऐका देऊन कान ।।

 

गौरीहरपुजले अन बोहल्यावर चढले।

. . . . . . . रावांच्यासुखासाठी संसारात गढले ।।

 

मराठांच्या मुलुखात भवानीची वारी ।

सैन्यचालले लढाईवर त्यात . . . . . रावांची स्वारी ।।

 

पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा ।

. . . . . . .. . रावांच्याजिवावर भरला हातात चुडा ।।

 

सोन्याच्या तारेत गुंफली एकदाणी ।

. . . . . . .रावांचेनाव घेते . . . . . . ची तान्हही ।।

 

काळ्या चंद्रकळेवर ताऱ्यासारख्या टिकल्या ।

. . . … .. . . रावांच्या मळ्यात खूप तुरी पिकल्या ।।

 

काळ्या चंद्रकळेवर नक्षत्रासारखे ठिपके ।

. . . . . . . रावांच्या गालावर कल्याचे  झुपके ।।

 

लग्नात घ्यावयाची उखाणे…

आकाशात उगवला चंद्र, निषेला लागली चाहूल

….. च्या संसारात टाकले पहिले पाऊल.

 

 

माहेरची नाती म्हणजे जणु रेशमाच्या गाठी

रेशिंबंध सोडून सासरी आले….. च्या साठी.

 

 

माहेरची माया पाश सोडून आले आज सासरी

माप ओलांडून प्रवेश करते….. च्या घरी.

 

 

भिल्लीनीच्या च्या नृत्याने शंकर झाले मोहित

संसाराला सुरुवात करते…… च्या सहीत.

 

 

नाव आहे ओठी  पण लज्जेच बंधन

…… चे नाव घेऊन सोडते मी कंकण.

 

 

कळत नाही माझे मला आहे स्वप्न की भास?

….. ना देते मी जिलेबीचा गोड घास.

 

 

मनीमानसी चे स्वप्न आज झाले साकार

….. नी केलाय माझा पत्नी म्हणून स्वीकार.

 

 

बरेच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार

….. नी करावा जिलेबीच्या घासा चा स्वीकार.

 

 

शंकराच्या मंदिरामध्ये समोर असतो नंदी

….. च्या संसाराची आज झाली नांदी.

 

 

देवघरातला नंदादीप तेवत ठेवते अखंड

….. ना घास देते मी पुरी आणि श्रीखंड.

 

 

साखरपुडा झाला, लग्न ठरलं ,सर्वांनी केलं अभिनंदन

….. च्या जीवनाचे करेन मी नंदनवन.

 

 

रंगांमध्ये जावे रंगून ,सुरांमध्ये व्हावे दंग

….. चा संसार आदर्श करण्याचा बांधते मी चंग.

 

 

मनासारखा पती मिळावा म्हणून हरितालिके ला पुजल

…… च्या नावाने आज गळ्यात मंगळसूत्र बांधलं.

 

 

कॉम्प्युटरचा शोध लागला ,जग जवळ आलं

…..  व….. च आज थाटात लग्न झालं.

 

 

संसार रुपी निरांजनात लावते प्रीतीची फुलवात

….. च्या साथीने करते संसाराला सुरुवात.

 

स्मार्ट मराठी उखाणे…

 

जिजाऊच्या पोटी जन्मले शिवाजी सारखे सुपुत्र

….. च्या नावाने गळ्यात घातले मंगळसूत्र.

 

 

सोन्याच्या कोंदणात चमकतो अस्सल हिरा

….. सारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा.

 

 

मंडपात पसरलाय उदबत्त्यांचा सुवास

….. ना देते मी लाडूचा गोड घास.

 

 

लग्न घराच्या वराडाची बसली खाशी पंगत

….. च्या घरी सर्वांची होईल आगत-स्वागत.

 

 

दार अडवून उभी आहे ननंद आणि जाऊ

लाज वाटते बाई मला…… च नाव कसे घेऊ.

 

 

आनंदाने वेचते मी आशीर्वादाची फुले

….. च्या घरी आज पहिले पाऊल टाकले.

 

 

मंगळसूत्राच्या काळया  पोती मध्ये जोडले सासर माहेर

….. नी केला आज मला सौभाग्याचा आहेर.

 

 

संसार रुपी सागरात डोलते आयुष्याची होडी

सर्वांच्या आशीर्वादाने सुखी राहो…… व…… ची जोडी.

 

Smart marathi ukhane for female

काळोखी रात्र संपली, उषेचे लागली चाहूल

….. च्या संसारात टाकते पहिले पाऊल.

 

 

नेत्रा तल्या आनंदाश्रुसह माहेर मी सोडले

….. ज्या घरांमध्ये आज पहिले पाऊल ठेवले.

 

 

अवघे जीवन आनंदाने कसे भरभरून आले

….. चे आज मी सौभाग्यवती झाले.

 

 

शांत निरभ्र आकाशात चांदण्यांची झाली बरसात

….. चे नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात.

 

 

नागपूरची संत्री आणि नाशिकचे प्रसिद्ध द्राक्ष

….. शी झाला विवाह आज तुम्हा सर्वांचे साक्ष.

 

 

लग्न करीन तर तुमच्याशीच केला होता निग्रह

….. चे नाव घेते आता करू नका आग्रह.

 

 

कोकणात जाताना लागतो वळणावळणाच्या घाट

….. चे नाव घेऊन सोडते भाऊ भावजयीची गाठ.

 

 

पहाटेच्यावेळी दवबिंदू पानावर पसरले

….. ना पाहून मी देहभान विसरले.

 

 

सर्वांना करते नमस्कार, आशीर्वादाचा द्या आहेर

….. च्या साथीसाठी सोडून आले माहेर.

 

 

एकनाथांच्या घरी हरि होतो दास

….. चे नाव घेते तुमच्यासाठी खास.

 

 

मंगळागौरीच्या वेळी घ्यावयाचे उखाणे …

 

श्रावण सरित हिवा साज लेवून सृष्टी देवी सजली,

…… च्या सौख्या स्तव मंगळागौर पुजली.

 

 

सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवाते,

…… ना दीर्घायुष्य मंगळागौरीस मागते.

 

 

श्रावण महिन्यातील सण म्हणजे उत्सवाची पर्वणी,

….. च नाव घेते मंगळागौर कारणी.

 

अशोकवनात सिंह करी गर्जना,

…… सुखी राहूत ही मंगळागौरी कडे प्रार्थना.

 

 

मंगळागौरी मंगल माते वंदन करिते तुला,

…… च नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.

 

 

वेलीला शोभे फुल, स्त्रीला शोभे अपत्य,

…… च नाव घ्यायला मंगळागौरीचं निमित्त.

 

 

मोती होऊन सुवर्णाच्या ताटात बसण्यापेक्षा, जलबिंदू होऊन चातकाची भागवावी तहान,

…… सोबत केली मंगळागौरीची पूजा महान.

 

 

संसाराच्या रांगणी प्रीतीची चंद्रकोर,

…… च्या सुखासाठी पुजली मंगळागौर.

 

 

सौभाग्यवती चा अलंकार म्हणजे काचेचे चुडे,

….. च नाव घेते मंगळागौरी पुढे.

 

 

प्रत्येक धार्मिक विधी मागे लपलेला असतो खरा अर्थ,

…… च नाव घेते मंगळागौर प्रित्यर्थ.

 

 

वर्षा ऋतूत हसते धरित्री,

….. च नाव घेते मंगळागौरी च्या रात्री.

 

 

निसर्गरम्य श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी,

….. च नाव घेते खास तुमच्यासाठी.

 

 

मेघमल्हार रंगतोय, श्रावण सर कोसळतोय,

…… च्या नावाने मंगळागौर सजते.

 

 

रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,

…… च नाव घेते मंगळागौरी साठी.

 

 

गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी,

….. च नाव घेते मंगळागौरी पाशी.

 

 

मंगळागौरी मंगल माते वंदन करते तुला,

…… च नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.

 

 

संसाराच्या देवार्यात सुख दुःखाचा खेळ अविनाशी,

….. ना दीर्घायुष्य मागते मंगळागौरी पाशी.

 

 

आयुष्याचा लावीन दिवा, कष्टांचे घालीन भरण,

…… च नाव घ्यायला मंगळागौरीच कारण.

 

 

दसऱ्याला आपट्याची पान हृदय मिलन दर्शविते,

…… ना दीर्घायुष्य मंगळागौरीस मागते.

 

 

समईतील ज्योती, भक्तिभावाने उजळविते,

….. नाव मंगळागौरी पुढे घेते.

 

 

आकाशात दाटून आले मेघ, मोर लागले नाचायला,

…… च नाव घेते मंगळागौरीला.

 

बारसे विशेष उखाणे …   

गुलाबाचा ताटवा लतांचा कुंज,

…… च्या बाळाची आज आहे मौज.

 

 

गोकुळात कृष्ण सर्वांना झाला हर्ष,

…… च्या बाळाचं आज आहे बारसे.

 

 

दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र,

…… मुळे मला मिळाले मातेच मानपत्र.

 

 

संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल,

…… च्या बाळाची सर्वांना लागली चाहूल.

 

 

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा,

…… च्या वंशात आला दिप नवा.

 

 

थोर कुळात जन्मले, सुसंस्कारात वाढले,

……. च्यामुळे आई आज झाले.

 

 

मोत्याची माळ सोन्याचा साज,

…… च्यामुळ आई झाले आज.

 

 

शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी,

…… नाव घेते बाळाच्या बारशाचे दिवशी.

 

 

पंचम सूर म्हणजे संगीताचा साज,

…… रावांच्या बाळाचं बारसं आज.

 

 

हिऱ्याच्या कंठाला, मोत्याचा घाट,

…… च्या बाळाचा बारशाचा थाट.

 

 

जीवनात ही घडी अशीच राहू दे,

…… चेक प्रीती फुल असेच हसू दे.

 

संक्रांत विशेष उखाणे…

 

गोडी घ्यावी मुळापासून स्निग्धता घ्यावी तिळापासून,

…… च नाव घेते आशीर्वाद द्यावा मनापासून.

 

 

संक्रातीच्या शुभ दिने तिळगुळ घ्या बोला गोड,

…… ची लाभली मला संसारात जोड.

 

 

संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराणे ओटी,

…… च नाव घेते खास तुमच्यासाठी.

 

 

स्नेहा मधला मधुर गोडवा टिकावा वर्षभर,

…… च नाव घेते पाळी आली …… वर.

 

 

संक्रातीच्या सनाला येतात नटून बायका,

…… च नाव घेते सर्वजण ऐका.

 

 

तिळगुळ घ्या गोड बोला, संक्रांतीच्या शुभेच्छा देते गोडीन,

…… च नाव घेते प्रेमभाव भक्तीने.

 

 

संक्रांतीच्या सणाला लागतात गाजर, बोरं, ऊस,

…… बरोबर संसारात मी आहे खुश.

 

 

नवीन वर्षाचं स्वागत केलं उत्साहाला आलं उधाण,

…… नाव घ्यायला आज संक्रातीचे कारण.

 

 

भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,

…… नाव घेते संक्रातीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.

 

 

संक्रांतीच्या सणाला करतात हलव्याचा साज,

…… मुळे झाले मी सौभाग्यवती आज.

 

 

आंबे जगन माते वंदन करते तुला,

…… नाव घेते संक्रांतीच्या सणाला.

 

 

 

 

Leave a Comment