50+ मराठी लव्ह कोट्स (Marathi Love Quotes In Marathi).

Spread the love
प्रेमाची परिभाषा ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. जे कालपर्यंत परके होते, त्यांची काही क्षणांची सोबतही जगण्याचं कारण वाटू लागते. प्रेमाचं नातं जोडणं जितकं सोपं आहे तितकंच ते निभावणं कठीण असते. प्रेम आणि रिलेशनशिपच्या क्षणांसाठी खास मराठी लव्ह कोट्स (Marathi Love Quotes In Marathi).
1000+ प्रेमाचे स्टेटस मराठी | Love Status in Marathi | love quotes in marathi. - Status in Marathi
  • किती क्यूट असतं ना ते रिलेशनशिप, ज्यामध्ये दोघंही रोज भांडतात पण तरीही एकमेंकाशिवाय राहू शकत नाहीत.
  • तिचं प्रेम तर जणू एखाद्या वकीलासारखं झालंय…जे माझ्या प्रेमाला तारीख पे तारीख देत आहे.
  • मला झालीयं प्रेमाची बीमारी… सकाळी-संध्याकाळी गरज तुम्हारी
  • देवाने सर्व काही दिलं आहे आयुष्यात बस आता एक romantic girlfriend ची कमी आहे
  • विटावर विटा सात विटा I Love U Pillu  बाकी सगळ्या फुटा
  • मी तुझा पिल्लू तू माझी शोना चल ना आता तरी माझी बायको होना
  • ऐक ना गं.. limit मध्ये राहून तुझ्यावर unlimited प्रेम केलंय
  • मुलींना द्यायची असेल तर प्लीज रिस्पेक्ट द्या बाकी लाईन तर सगळेच देतात.
  • देवा दे की रे एखादी काळी शेंबडी कोणती तरी पोरगी पटवून
  • माझं एक स्वप्न आहे, माझ्या स्वप्नात सदैव तूच यावे
सहज चालता चालता
आयुष्य गेल सरून
माझ्यासोबत ते पण जळाले
जे पाहत होते दुरुन….!!!
बघतो फोटोतच तुला,
रात्र रात्र मज झोप नाही….
फोटो तुझा पाहताना,
छंद दुसरा उरलाच नाही…!!!
अश्रु पापण्यात अन्
सल मनात आहे अजुन मी साठवलेले
आठवत नाही मला अजुन तरी
माझ्या इतके तू मला आठवलेले…
तिच्या डोळ्यात गुंतून जावस वाटतं,
तिच्या गालात फुल चुरडावस वाटतं,
तिच्या काळ्या केसात निजावस वाटतं,
आता फक्त तिच्यासाठीच जगावस वाटतं…..!!!
जगावेगळी प्रीत तुझी,
खरच मला नाही कळत….
मी कसाबसा समजुन घेतो पण,
मनास माझ्या ती नाही कळत…..
** अबोल भावना **
मनी उमलल्या आज धुदं अश्या भावना,अबोल प्रेम माझं कधी कळेल तूला सागंना…
ओठावर येण्या अगोदर तू नजरतूनी जाणना,वेड्या मनातील या माझ्या या वेड्या भावना…!!!
** अबोल भावना **
मनी उमलल्या आज धुदं अश्या भावना,अबोल प्रेम माझं कधी कळेल तूला सागंना…
ओठावर येण्या अगोदर तू नजरतूनी जाणना,वेड्या मनातील या माझ्या या वेड्या भावना…!!!
भविष्याला गाफील राहून प्रेमात रंगले ते वेडे
बाजी शेवटी नशीब च का जींकतं? न उलगडले
आजवर हे कोड…..!!!
लपवुन अश्रुं जे हसतात
ते म्हणे प्रेमात असतात
आपल्याला कोणी ओळखु नये
म्हणून हास्याचे मुखवटे लावतात…!
तुझ्यापासून…..
तुझ्यापासून दूर असुनही,
नेहमी जवळ भासेन मी….
जेंव्हा जेंव्हा मीस करशील मला,
तुला समोर दिसेन मी…..!!!
तुझ्या आठवणीत कोणताच
दिवस नाही सरला….
साग न ग सखे
एवढा का अबोला धरला ….!
काळीज माझं कोणत्या मातीचं
अनेकदा तुटलं तरीही चालायचं
हजार तुकडे करुन पाहिले
तरीही प्रत्येक तुकड्यात
तुझंच नाव यायचं…!
तुझा सहवास तुझा भास
तुझी चाहुल अन तुझा ध्यास
सारं सारं असंच रहावं..
तू आहेस म्हणुनच तर
वाटतं अजुन थोडं जगुन पहावं….
तुझ्या विना
तुझ्या वाचुन जगावे कसे
तुझ्या विना रहावे कसे
तुच सांग मला प्रिये
सहज तुला विसरायचे कसे….!!!
नजरेची भेटी…
आकाशातल्या चंद्राकडे बघता आज
आपली ती भेट मला पुन्हा आठवते..
अशीच अबोल होतीस तु त्या क्षणी
पण नजरेच्या भेटीतमन तार छेडत होते…
No photo description available.
  • प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती नक्की असावी, जिच्याशी बोलून सगळी टेन्शन दूर होतील.
  • जर प्रेम खरं असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही.
  • एका यशस्वी नात्याची व्याख्या आहे, एकाच व्यक्तीच्या अनेकदा प्रेमात पडणे.
  • कोणीतरी विचारलं की प्रेम कधी झालं होतं. मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे.
  • तुझ्या नावावरही इतकं प्रेम आहे की, राग आल्यावरही तुझं नाव ऐकताच ओठावर हसू येतं.
  • मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको तर जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय.
  • कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक, प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.
  • तुटलेलं हृदय ही धडकतं आयुष्यभर, कधी कोणाच्या आठवणीत तर कधी कोणाची वाट पाहात.
  • जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ
  • तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे.

Love Status In Marathi For Boys And Girls | लव्ह स्टेटस प्रेमिकांसाठी

प्रेमात सगळं माफ असतं…असेच काही प्रेमात गंमत आणणारे लव्ह स्टेटस प्रेमात पडलेल्या मुलांमुलींसाठी (Love Status In Marathi For Boys And Girls)

  • काही लोकांचं नातंही सरकारी असतं, ना तर फाईल पुढे सरकत ना अफेअर संपतं.
  • जर प्रेम हेच उत्तर असेल तर तुम्ही प्रश्न बदलू शकता का? मग बोलू टाका ना आय लव्ह यू.
  • जेव्हा रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट आणि स्मार्टफोनमध्ये नेट नसतं, तेव्हा लोकं गेम खेळू लागतात.
  • ब्रेकअप कपल्सचा होतो पण शिक्षा मात्र डीपी आणि स्टेट्सला मिळते.
  • दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं, दोघांमध्येही गोडवा उरत नाही.
  • प्रेमाचं नातं अगदी बुद्धीबळासारखं असतं. एक चुकीची चाल आणि डायरेक्ट लग्न.
  • प्रेम एखाद्या गोड दुखण्यासारखं असतं. जे एक्सरेमध्ये दिसत नाही पण तरीही असतं.
  • चिनी मातीच्या बरणीत लोणच्याच्या फोडी लाखात एक आहे बघ प्रिये तुझी माझी जोडी
  • गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ शोभतो काळा काळा तुझ्या गोड हास्याचा आणि प्रेमाचा मला लागला लळा
  • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रियकरा तुझंच नाव घेणार आपल्या लग्नाच्या दिवशी

Prem Quotes In Marathi | प्रेमाचे कोट्स

Love Msg And Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश | POPxo Marathi

काहींची प्रेमकथा ही प्रेरणादायी असते. जी सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरते. अशाच प्रेमाचे कोट्स (Prem Quotes In Marathi)

  • जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं तर मग ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत असं समजून जा.
  • कोणावरही एवढंच रागवा की, त्यांना तुमची कमी जाणवेल. पण इतकाही राग नका करू की, ते तुम्हाला विसरून जगणं शिकतील.
  • नातं हे मनापासून असलं पाहिजे, फक्त शब्दाचं नाही….रूसवा शब्दात असायला हवा मनात नाही.
  • तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका, जो येतो आणि जातो. तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं जे सदैव तुमच्यासोबत असेल.
  • कोणतंही नातं तोडण्याआधी स्वतःला एकदा नक्की विचारा की, आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं?
  • खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल.
  • कोणतंही नातं बनवणं अगदी मातीवर लिहीता येईल इतंक सोपं आहे पण निभावणं अगदी पाण्यावर पाणी लिहीण्याइतकं कठीण आहे.
  • तुमचा ईगो दाखवून नातं तोडण्यापेक्षा माफी मागून नातं निभावणं चांगलं आहे.
  • काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात, दोघांमध्ये एवढाच फरक असतो की, काच चुकीमुळे तुटते तर नाती गैरसमजाने.

Deep Love Quotes In Marathi | गहिऱ्या प्रेमासाठी लव्ह कोट्स

गहिऱ्या प्रेमाची सुरूवात होते ती आय लव्ह यू म्हणजेच प्रेमाच्या होकाराने… प्रेमाची अडीच अक्षरं मांडणारे खास गहिऱ्या प्रेमासाठी लव्ह कोट्स (Deep Love Quotes In Marathi).

  • प्रेम म्हणजेच जीवन… I Love U
  • I Love U…. आजही तुला पाहिल्यावर अगदी पहिल्यांदा पाहिल्यासारखं वाटतं.
  • I Love U फक्त तू जशी आहे त्यासाठी नाहीतर मी तुझ्यासोबतीने जसा झालोय त्याबद्दल.
  • I Love U… तू मला कितीही त्रास दिलास तरी त्या प्रत्येक त्रासदायक क्षणात मला तुझ्यासोबत जगायचंय.
  • प्रत्येक दिवशी I miss u… प्रत्येक तासाला I need u… प्रत्येक मिनिटाला I feel u… प्रत्येक सेकंदाला I want u…  Forver I Love u
  • माझं जग तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यावरच संपत I Love U
  • एक I love u ची किंमत कोट्यावधी रूपयांनाही येणार नाही.
  • I Love u दरदिवशी डोक्यात येणारी पहिली शेवटची गोष्ट तू आहेस.
  • तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण स्वप्नवत आहे I Love U
  • मी तुझ्या प्रेमात पडलो तुझ्या लूक्समुळे नाहीतर तू जशी आहेस त्यामुळे I Love U

True Love Quotes In Marathi | खरं प्रेम सांगणारे कोट्स

प्रेम व्यक्त करण्याचा सोपा उपाय म्हणजे कोट्स. असेच काही प्रेम सांगणारे कोट्स (True Love Quotes In Marathi) शेअर करत आहोत.

  • आज मौसम बदलला आहे पण आपले फ्रेंड्स नाही.
  • फरक आपल्या विचारांचा आहे नाहीतर मैत्री पण प्रेमापेक्षा कमी नसते.
  • आपली मैत्री इतकी पक्की असावी की नोकरी तू करावी आणि सॅलरी माझी व्हावी.
  • आपली मैत्री जीवापेक्षा भारी.
  • विनाकारण आहे म्हणून तर मैत्री आहे नाहीतर कारणाने तर व्यापार केला जातो.
  • काळाच्या ओघात कळलेच नाही
    आयुष्य कसे कुठे बदलले
    तू भेटलीस आणि पुन्हा जगावेसे वाटले
  • बंध विश्वासाचा तुझा माझा
    आयुष्यभर अगदी तळहातावर जपण्यासारखा आय लव्ह यू
  • ज्या चहात साखर नाही
    तो चहा पिण्यात मजा नाही
    ज्या जीवनात प्रेम नाही
    ते जगण्यात मजा नाही
  • आपल्या टेन्शनवर एकच रामबाण उपाय
    आपल्या प्रेयसीचा फक्त एक कॉल
    तो आला की, सर्व काही होते गायब
    जसं आधी काही झालंच नाही
  • प्रेम जर खरं असेल तर
    कधीच दूर जाण्याची कारण
    दिली जात नाहीत उलट जवळ
    येण्यासाठी मार्ग काढला जातो

200+ Love Quotes In Marathi | Love Shayari Marathi -

Life Partner Quotes In Marathi | जोडीदारासाठी खास लव्ह कोट्स

जोडीदार आयुष्यात आल्यावर आपलं आयुष्य नव्याने सुरू होतं असंच काहीसं सांगणारे हे खास जोडीदारासाठी खास लव्ह कोट्स (Life Partner Quotes In Marathi)

  • मला कधीच वाटत नाही मला सार सुख मिळावं फक्त वाटतं दुःखात तू खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहावं.
  • आज या पावसाला साक्षी ठेवते आणि तुला हे वचन देते की आपण कायम असच दोघं साथ राहू.
  • रमत नाही मन कुठेच तुझ्या प्रेमात पडल्यावर हसू उमटते ओठावर तू अशी समोर आल्यावर.
  • वाऱ्याची झुळूक यावी तशी येतेस तू पावसाची सर यावी तशी जातेस तू कडकत्या उन्हात सावलीसारखी असतेस तू.
  • जसे आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर तसे मला आयुष्याचा प्रवास करायच्या आहे तुझ्याबरोबर.
  • तुझ्या श्वासात मी आस मनाची मनाला… हवास तू माझ्यासाठी जीवनसाथी म्हणून सोबतीला.
  • चालता चालता मिळालास तू बघता बघता माझा झालास तू.
  • तुझ्यात अन माझ्यात एक असं नातं विणू सगळ्यांनाच हेवा वाटेल असं जीवनसाथी सोबती बनू.
  • लहानसहान गोष्टींनीही व्हायचो त्रस्त पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून झालंय आयुष्य खूपच मस्त.
  • चंद्राला पाहून भरती येते सागराला तशी तुझी प्रेमाची साथ असू दे माझ्या जीवनाला.

Leave a Comment