पुंगनूर गाय व तिची माहिती(Pungnur smallest cow breed)नुकतेच आपल्याला देशाचे प्रधान मंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांनी मकरंसंक्राती च्या दिवशी आंध्र प्रदेश मधील गोजिरवाण्या पुंगनूर ह्या गाई सोबत चे फोटो मीडिया वर आले त्यामुळे सर्वाना ह्या पुंगनूर गाई बद्दल उत्सुकता वाढली.
त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
देशाचा विचार केला तर 50 देशी गाईच्या जाती भारतात आढळून येतात व यामध्ये अतिशय दुर्मिळ असलेली व शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर असलेली पुंगनूर जातीची गाय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे. या गाईचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे याची उंची फक्त तीन ते साडेतीन फुट इतके असते व ही गाय आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
दीड ते तीन फूट पर्यंत उंची असलेल्या या गाईचे वजन 100 ते 150 किलो पर्यंत असते. आकारमान कमी असल्यामुळे चाऱ्यावरचा खर्च देखील कमी लागतो व त्यामानाने दूध चांगले देतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही गाय खूप फायदेशीर आहे. साधारणपणे एका दिवसाला पाच किलो चारा खाऊन पाच लिटर दूध देण्याची क्षमता या गाईची आहे.
या गाईचे किंमत आणि इतर महत्त्वाचे वैशिष्ट्ये
पुंगनूर जातीची गाय तुम्हाला 40000 रुपयांमध्ये देखील मिळू शकते. साधारणपणे दोन गाई तुम्हाला 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीत मिळू शकतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे या गाईचे शेण आणि गोमूत्र त्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नसल्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापर केला जातो. तसेच या गाईचे शेण आणि गोमूत्र आयुर्वेदिक असल्याचे देखील म्हटले गेले आहे. अतिशय शांत असल्यामुळे कोणीही या गाईचे देखरेख आरामात करू शकते. त्यामुळे पुंगनूर जातीचे गाय हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
या गाईचा आकार लहान असल्यामुळे पुंगनूर गाय पाळण्यासाठी विशिष्ट्य गोठ्याची गरज लागत नाही. आपण आपल्या अंगणात, गच्चीवर, पडवी मध्ये छोट्याशा जागेमध्ये देखील पुंगनूर गाईचे संगोपन करू शकतो. शहरांमध्ये देखील या गाईचे संगोपन केले जाऊ शकते व पुंगनूर गाईला आहार देखील कमी लागतो.
पुंगनूर गाय मुख्यतः
आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामध्ये आढळते. देशभरातून पुंगनूर गायीच्या खरेदीसाठी लोक आंध्र प्रदेश येथे येत असतात. पुंगनूर गाईची अलीकडच्या काळात मागणी वाढलेली असली तरी ही गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे व त्यामुळे आंध्रप्रदेश सरकारकडून संबंधित गायीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
उच्च दर्जाचं दूध:
पुंगनूर गाईंचं दूध त्यांच्या आकारावरून थटक्या नाही. खरं तर त्यांच्या दुधात सहसाच्या गायीपेक्षा जास्त, साधारणपणे 8 टक्के चरबीयुक्त असते. यामुळे, त्यांचं दूध (High milk fat content cow)आरोग्यदायी आणि जास्त जाड आहे. या दुधात औषधीय गुणधर्म असल्याचेही मानले जाते.
सूखावाच्य(दुष्काळचा) प्रतिरोध:
आंध्रप्रदेशातील चरीच्या थराला सामोरे जाण्याची सवय या गाईंची(Indian cow breed) असल्यामुळे त्या सूखावाचा(दुष्काळचा) सहज सामना करू शकतात. संवर्धनाची गरज: दुर्दैवाने, या अनोख्या जातीची संख्या आज कमी होत आहे. त्यामुळे त्यांचं संवर्धन करणं आणि पुन्हा वाढ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी सरकारी आणि खासगी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पुंगनूर गाय ही आंध्रप्रदेशाच्या सांस्कृतिक आणि कृषी वारसाचा अविभाज्य भाग आहे. तिच्या छोट्या आकारात लपलेली मोठेपणाची कहाणी त्यांना अनोखी करते. त्यांचं संवर्धन करणं ही न फक्त आर्थिक गरज आहे, तर एक सांस्कृतिक जबाबदारीही आहे.
I’m always excited to see what you come up with next. Keep it coming! ❤️