शेळी चा गर्भपात होणे(गाभडणे)
शेळ्या गाभडतात का..??? चला जाणून घेऊयात शेळी च्या गर्भपात म्हणजेच गाभडणे बद्दल..!!!
शेळी चा गर्भपात (गाभडणे) म्हणजे-काही करणणं गर्भ पूर्ण विकसित न होणे आणि शेळीच्या पोटातच मरणे अथवा वेण्याच्या वेळेस मेलेला गर्भ बाहेर येणे किंवा गर्भ चे दिवस पूर्ण होण्याच्या आधीच गर्भ शेळीचे पिल्लू मेलेले असणे किंवा खूप-खूप अशक्त असणे अविकसित असणे.
शेळीपालणामधे तुमच्या गोठ्यावर किंवा काळापामध्ये 4-5% शेळ्या गाभडणे साहजिक आहे किंबहुना ही चिंताजनक बाब नाहीये.पन जर तुमच्या आहे लक्षात आले की आपल्या गोठ्यात अथवा शेळ्याच्या काळपात शेळ्या 4-5% टक्के पेक्षा जास्त गभडत आहेत, तर आपणास शेळ्या गाभडणे रोखण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.
शेळी गभडण्याचे मुख्यत्वे तीन करणे आहेत,आणि तेच नवजात अर्भयार्कच्या मृत्यूस जवाबदार आहेत. यामध्ये सदरील शेळीची वेळेत काळजी तसेच उपचार न केल्यास शेळीला कायमच वंध्यातवा अथवा जीव ही गमवावा लागू शकतो.
1)कॉम्पिलोबॅक्टर (Campylobacter):-
हा एक प्रकारचा जिवाणू आहे. सदरील विषणूची बाधा/लागण तोंडातून होते,हा जिवाणू अत्यंत संसर्गजन्य असल्याने हा शेळ्याना आणि मानवाना सुद्धा घातक आहे. या जीवणूचा संसर्ग झालेल्या शेळ्या वेण्याच्या अगोदर चार ते सहा आठवड्या आधीच गाभडतात.गाभडलेल्या शेळीचे पिल्लू मेलेले असते किंवा खूप-खूप अशक्त असते.एकदा जर शेळीच्या तोंडावटे जिवानुजन्य चाऱ्यातून अथवा पाण्यातून कॉम्पिलोबॅक्टर शरीरात प्रवेश केला,तर ही जिवाणू पोटामधील आतडया तुन गर्भाशयकडे आणि पुढे गर्भाकडे जातो.ह्या जीवनु मूळे गर्भाशयातील मोकळ्या जागेत द्रव जमा होण्यास सुरवात होते आणि परिणामी गर्भपात होतो. त्यासोबतच शेळीला अतिसार(संडास लागते) गर्भमार्गातून रक्तस्त्राव होतो.शेळी तानावत येते,मूत्राशयचा संसर्ग होतो,तसेच जार हा पोटातच रोखला जातो.
कॉम्पिलोबॅक्टर जीवणूचा पुढील प्रसार रोखण्यासाठी गोठयातील पाण्याचे स्त्रोत उदा. पाण्याची टाकी,हौद,बाकेट ,टोपले इत्यादि. स्वच्य् व नीर जंतुक करून घ्यावे. त्यासाठी चुना अथवा पोटॅशियम परमागानेट वापरावे. पशुवैद्यकच्या सल्ल्यानुसार गोठ्यावर प्रतिजावके(Antibiotic)आपल्या शेळ्याना द्यावे.
2) क्लेमिडिया(Chlamydia):-
क्लेमिडिया हा आजार संसर्ग झालेल्या पक्ष्याच्या विष्ठा पासून(कोंबड्या,कबुतर,बदक इत्यादि) किंवा संसर्ग झालेल्या प्रणाच्या शरीरावरील पार्जिवि किटकांमुळे(सुवा,पिसाव,ऊवा,गोचीड)यामुळे पसरतो.
संसर्ग झालेल्या शेळ्या वेण्याच्या अगोदर तीन आठवड्या आधीच गाभडतात.गाभडलेल्या शेळीचे पिल्लू मेलेले असते किंवा खूप-खूप अशक्त असते.एकदा का हा संसर्ग मुखवाटे अथवा रक्तावाटे शेळीच्या शरीरात गेला की तो शेळीच्या गर्भाशयावर हल्ला करतो यामध्ये गर्भाशयातील नाळ/जार(placenta) बाधित होतो व सुजतो त्यामुळे पिळल्यालाया अवशक्य पोषाकतत्वे मिळत नाहीत. गर्भपताच्या(गभडण्याच्या) तीन दिवस आधी शेळीच्या गर्भ मार्गातून रक्तस्त्राव दिसून येतो,आणि तीच गर्भपात झाल्यानंतर शेळीला एकदाच जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो जो की क्लेमिडिया रोगाने बाधित रक्त असते,
क्लेमिडिया रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोठयातील स्वच्यता राखावी,वेळोवेळी परजीवी कीटक(सुवा,पिसाव,ऊवा,गोचीड) होऊ नये म्हणून Deltamethrin, Cypermethrin किंवा Amitraz ची फवारणी करावी.
3)टोकसप्लाइहोसईस(Toxoplasmosis):-
टोकसप्लाइहोसईस हा आजार टॉक्सोप्लाझ्मा गोंडी एक परजीवी प्रोटोझोआ(एकपेशीय) विषाणूमूळे होतो.हा आजार अत्यंत धोकादायक असून यह शेळ्या प्रमाणे महिलाना सुद्धा होऊ शकतो,हा आजार टॉक्सोप्लाझ्मा गोंडी संसर्ग असलेल्या मांजरेच्या विष्ठा शेळीच्या चाऱ्याच्या संपर्कात आल्यास,व त्यांच्या तोंडावटे पोटात गेल्यास टी गोंडी विषाणू शेळीच्या गर्भाशयातील गर्भाच्या नाळे पर्यन्त पहोचतात आणि गर्भकडे जातात. यामुके पिल्लू मेलेले अथवा अशक्त जन्मला येते या विषणूचा दुष्परिणाम शेळीवरी होतो.ज्यामध्ये शेळी चे स्नायू थिले होणे,स्वसनाला त्रास होणे,जठरचा त्रास होणे,कावीळ होणे आणि मेदुवारी परिणाम दिसून येतो.या विषणउमूळे पिळल्याला तसेच शेळीला वाचवणे शक्य हॉट नाही त्यामुळे
टोकसप्लाइहोसईस हा आजार टाळण्यासाठी गोठातील सर्व शेळ्या,कुत्रे,मंजरी यांचे निर्जंतुकीकरण(Deworming) वेळचे वेळी होणे आवश्यक आहे.तसेच नजीक च्या पशू वैद्यकचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
शेळ्यातील गर्भपात/गाभडणे(इतर कारणणी)
आपण कितीही काळजी घेतली तरिही काहीवेळा शेळ्या गभडतात,त्याचा गर्भपात होतो.मी जारी म्हणले आहे की तुमच्या गोत्यावर 4 ते 5 टक्के गर्भपात होणे साहजिक आहे तरीसुद्धा गर्भपात होणे,शेळी गाभडणे याला नेहमीच एक कारण असते.आणि ते रोखण्यासाठी आपण बऱ्याच उपाय योजना करू शकतो.जसे की,योग्य चारा व्यवस्थापन,वेळेवर जंटणशक पाजणे,इतर औषधोपचार करणे,खुरकाचे नियोजन करणे,शेलयांचे नियमित लसीकरण करणे,गोठ्याचे नियोजन ऋतु नुसार करणे इत्यादि.
तरीसुध्या शेळी गभडण्याचे कारण नेहमीच स्पट नसते. खालील बाबिनमुळे देखील शेळ्या गाभडू शकतात त्याचा गर्भपात होऊ शकतो.
- संतुलित आहार न मिळल्याने किंवा कुपोषण झाल्यावर विटामिन ए आणि खनिज मिक्षणाचा कमीमुळे
- खूप लांब चरावयास जाऊनही खाण्यास काही मिळत नसलेल्या शेळया .
- पोटात जुळे किंवा तिळे आहेत आणि अपुरा आहार पुरवला जाणाऱ्या शेळया .
- पूर्वीच्या गर्भपातानंतर किंवा प्रसूतीनंतर योग्य विश्रांती न देता भरवलेली शेळी.
- अतिउष्ण हवामानाचा ताण पडण्याऱ्या शेळया .
- खाद्यातील वारंवार व अचानक केलेले बदल, दुषित चारा सेवनामुळे .
- ठाणबंद(बंदिस्त) पद्धतीत आवश्यक तेवढी जागा न मिळल्यामुळे गदीत कोंबून भरलेल्या शेळया
- घसरून पडण्याने प़ोटास मार लागल्याने
- शेळयांचा भांडणात पोटास मार लागणे व शिंगे लागणे
- भयभीत होणे व हिंरत्र पंशुच्या डरकाळीने भेदरून जाणे
- हाँरमोन च्या कमी असणे
- लसीकरण केल्यास होणारा एँलजीमुळे.
- वाहनातून करावा लागणारा लांबचा प्रवास.
- दूषित किंवा गरम पाणी पिन्यात आल्यास.
शेळ्यातील गर्भपात/गाभडणे उपाय : –
- नराद्वारे प्रजनन करणे, किंवा इतर स्रोता पासुन अस्वच्छता असल्याने माद्यांच्या प्रजनन अंगात संक्रमण होणे यामुळे गर्भधारणा होत नाही व गर्भपात होतो.
- यावर उपाय म्हणजे स्वच्छता ठेवणे, माद्यांचा पार्श्वभाग स्वच्छ पाण्यात जन्तु नाशक औषध जसे पोटॅशियम परमागणेट,डेटॉल, सावलोन इ टाकून स्वच्छ धुणे.
- याशिवाय तज्ञ व्हेटरनरी डॉक्टर कडून मादीची तपासणी करून प्रजनन अंगात संक्रमण असल्यास प्रजनन अंगात Furon गोळ्या टाकुन घेणे
- गर्भपात झाल्यास माद्यांना Replanta powder तीन छोटे चमचे पाण्यात मिसळून पाजणे , यामुळे प्रजनन अंगाची सफाई होते व संक्रमण हळू हळू कमी होऊन नष्ट होते या नंतर मादीला परत नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धतीने रेतन करता येते म्हणजे भरवता येते यानंतर मादी मध्ये गर्भ टिकून राहण्याची व सामान्य प्रसुती होण्याची शक्यता वाढते, व नुकसान कमी होते.
- जंतणशकाचा वापर लासिकरणा अगोदर करणे,तसेच गभण काळात Fenbendazole घटक असलेले जंतणशकाचा वापर करणे.
- जंतणशक दिल्या नंतर Liver Tonic देणे.
- चाटण विटीचा वापर करणे.
- कुत्रा व रानटी प्राण्यांपासून संरक्षण करावे .त्यांना वेगळे ठेवावे .नरासोबत अजिबात ठेवु नये .
- पोषक आहार व संतुलित खुराक मिनरलमिवचर शेळीला खायला दयावे.
- ओषधाचा प्रयोग पशुवैद्यकनच्या सलल्याशिवाय करु नये.
- वरील सर्व उपाय करून शेळया गाभडत असतील तर त्यांच्या योनीतील रत्रावांची सुक्षमजीवशारत्रीय तपासणी(Biological Tests) अनुभवी पशुवैद्यकाकडुन करून घ्यावी व संक्रामक गर्भपातास कारणीभूत जीवाणू व विषाणू ग्रासित शेळया जो पर्यंत बरा होते नाहीत तो पर्यंत इलाज करावा
- प्रजननसाठी वापरात येणाऱ्या नराच्या वीर्याची सुक्षमजीवशारत्रीय तपासणी (sperm test) करुन संक्रमण झालेल्या नरांना कळपातुन काढून टाकावे व त्यांचा जागी दुसऱ्या निरोगी नर आणावा.
- सतत गाभडण्यारा शेळया कळपातुन काढून टाकाव्यात.