शेळीपालन(Goat Farming)

Spread the love

शेळीपालन(Goat Farming)

    शेळीपालन(Goat Farming)  हे भारत मध्ये पूर्वी पासून चालत आलेले आहे, कुणी शेळी ला गरीबची गाय म्हणतात तर कुणी काळ धन कारण हि तसेच आहे. शेळी हे निसर्गात असलेल्या जवळ पास सर्वच वनस्पती चा पाला खाणारा प्राणी आहे. तसेच शेती सोबत शेळी पालन हि सोईस्कर होत असते. वर्तमान स्थिती मध्ये शेळीचे वाढलेले भाव मटणाची वाढलेली किंमत, शेळीपालनामध्ये आलेले आधुनिक बदल ह्यामुळे शेळी पालन हा फक्त जोड धंदा राहिलेला नसून एक पूर्ण वेळ व्यवसाय बनलेला आहे. दूध, मांस, फायबर आणि त्वचेसह विविध कारणांसाठी शेळ्यांचे संगोपन आणि प्रजनन केले जाते .शेळीपान हा व्यवसाय अनेक वर्ष्यांपासून शेतीपूरक व्यवसाय म्हणून केला जात आहे. पण आर्थिक मिळकत आणि तुलनेने कमी गुंतवणूक असल्यामुळे जगभरात लोकप्रिय होत आहे.

शेळी पालन  हे विविध हवामान आणि वातावरणात करता येते. रखरखीत प्रदेश, डोंगराळ प्रदेश आणि मर्यादित वनस्पती असलेले क्षेत्र यासारख्या कठोर परिस्थितीत योग्य नियोजन  करून शेळीपालन केले जाऊ शकते.

शेळी पालनापासून उत्पन्न :

  • मांस आणि दुध उत्पादन:शेळीपालनाचे मुख्य उद्दिष्ट मांस आणि दुध उत्पादन आहे. शेळीपालनातील योग्य ब्रीडची निवड केल्यास, त्यांचे मांस आणि दुध उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल. दूध व शेळ्यांचे मांस याला मोठी बाजारपेठ केवळ शहरातच नव्हे तर खेड्यातही उपलब्ध आहे.
  • फायबर आणि त्वचा:काही शेळ्यांच्या जाती त्यांच्या उच्च-गुणवत्तेच्या फायबरसाठी वाढवल्या जातात, ज्यांना मोहयर किंवा काश्मिरी म्हणतात. मोहायरचा वापर कापड उद्योगात आलिशान कापड आणि वस्त्रे तयार करण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त, बकरीचे कातडे चामड्याचे पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते.
  • लेंडी खात :शेळ्यांच्या लेंडी खत शेतीसाठी खूप उपयुक्त मानले जाते त्यामुळे त्याला खूप मागणी  आहे. खात विकूनही मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता.

शेळ्यांचीनिवडकरताना घ्यायची काळजी:

  • शेळीची वाढ वयाप्रमाणे झालेली असावी. शक्यतो१२ ते १५ महिन्याची  शेळी घ्यावी.
  • एका वर्षात शेळीचेवजन ३० कि. पेक्षा कमी असू नये.
  • शेळीचीकांस मोठी व मऊ असावी. सड सारख्या लांबीचे व जाडीचे असावे.
  • छाती भरदार व पोट डेरेदार असावे.
  • शेळीनीटपणे माजावर येणारी व न उलटणारी असावी.
  • दोन वर्षात तीन वेळा प्रजनन करणारी असावी.

शेळी पालन निवारा (शेड ):

शेळीपालन करण्यासाठी निवारा (शेड) अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेळीपालन मध्ये शेळ्यांचे मुक्त व्यवस्थापन, अर्ध बंदिस्त व बंदिस्त  शेळीपालन केले जाते

  1. मुक्त व्यवस्थापन(पारंपरिक शेळी व्यवस्थापन): या पद्धती मध्ये शेळ्या डोंगरावरती किंवा शेतामध्ये चारण्यासाठ मोकळ्या सोडल्या जातात. म्हणून मुक्त व्यवस्थापनामध्ये निवारा बनवताना शेळ्यांचे पाऊस, ऊन व इतर गोष्टींपासून संरक्षण होईल असा निवारा बनवावा.

      2.अर्ध बंदिस्त(मुक्त संचार गोठा पद्धत): या पद्धती मध्ये शेळ्या ना शेड तसेच शेड सभोवताली फिरण्यासाठी जागा असते जे कि जाळी मारून बंद असते त्या मोकळ्या जागेत शेळ्या दिवसभर राहतात ह्याच मोकळ्या जागेत शेळ्यांना खाण्यासाठी गव्हाणी तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असते.मुक्त संचार गोठा पद्धती मध्ये शेळ्यांना बाहेर मोकळीची हवा तसेच मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो खेळण्यासाठी जागा असल्या कारणाने त्या निरोगी देखील राहतात.

3.बंदिस्तशेळीपालन: बंदिस्त शेळीपालन या पद्धती मध्ये शेळ्यांना शेडमध्येच चारा, पाणी व इतर गोष्टींचे नियोजन केले जाते. त्यामुळे निवारा हा चांगल्या प्रकारचा व शेळ्यांना मुक्तपणे संचार करण्यासारखा असावं. यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. लहान पिल्ले  व मोठ्या शेळ्या  यांसाठी वेगळी जागा जाळी मारून बनवावी. दुधाळ असणाऱ्या शेळ्यांसाठी खाद्याचा प्रबंध सामान्य शेळ्यांच्या कळपापेक्षा वेगळा असावा.

शेळीपालन : शेळ्यांच्या जाती

योग्य ब्रीडची निवड: उच्च उत्पादन क्षमतेची आणि विक्रीसाठी जवळच्या बाजारात मागणी असलेल्या ब्रीडची निवड केली पाहिजे. तसेच हवामान व  चारा कोणत्याप्रकारचा आहे यावर शेळ्यांची कोणती ब्रीड आपण घेऊ शकतो हे अवलंबून असते.

  1. उस्मानाबादी
    या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रात उस्मानाबाद भागात आढळतात. या आकाराने मोठ्या असून मांसासाठी प्रसिद्ध आहेत. यांचा रंग काळा असून शिंगे मोठी असतात. या जातीत बरेचदा काळा किंवा पांढरा रंग सुद्धा आढळतो.

उस्मानाबादी शेळीउस्मानाबादी शेळी

  1. संगमनेरी शेळी
    या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रात उस्मानाबाद भागात आढळतात. या आकाराने मोठ्या असून मांसासाठी प्रसिद्ध आहेत. यांचा रंग काळा असून शिंगे मोठी असतात. या जातीत बरेचदा काळा किंवा पांढरा रंग सुद्धा आढळतो.

संगमनेरी शेळी

3.बेरारी

बेरारी शेळ्या महाराष्ट्रातील नागपूर, अकोला, वर्धा जिल्हा आणि मध्य प्रदेशातील निमर जिल्ह्यात आढळतात. शेळी कमी दूध देणारी आहे आणि मुख्यतः स्थानिक शेतकरी मांसासाठी पाळतात. या शेळ्या स्थानिक पातळीवर लाखी आणि गावराणी या नावानेही ओळखल्या जातात.

बेरारी

  1. बारबेरी
    ही जात उत्तर प्रदेशातील इटावा, आग्रा, मथुरा, अलिगढ या भागात आढळून येते. ही जात दुधाळ म्हणून प्रसिद्ध आहे. नराचे वजन ४० ते ५० किलो व मादीचे वजन ३५ ते ४० किलो असते. रंग पंधरा असून अंगावर काळे ठिपके आढळतात. पाय आखूड असल्याने त्या बुटक्या दिसतात. शेळ्या १५ महिन्यात दोन वेट देतात. या दोन किंवा तीन करडांना जन्म देतात. या शेळ्या सरासरी रोज १.५ ते २ लिटर दूध देतात. एका वेतात साधारणपणे २५० ते ३०० लिटर दूध मिळते.

बारबेरी शेळी

  1. ब्लॅक बंगाल
    या जातीच्या शेळ्या प. बंगालमध्ये आढळतात. यांचे मांस अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. कातडी मऊ असल्याने भारतात आणि परदेशात तिला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हि जात एका वेळी दोन किंवा तीन पिलांना जन्म देते. शेळ्या रंगाने काळ्या आणि तांबड्या असतात. शेळ्यांचे सरासरी वजन १५ किलो असते.

ब्लॅक बंगाल

  1. सिरोही ( अजमेरी)
    ही जात प्रामुख्याने राजस्थान व आजूबाजूच्या भागात आढळून येते. हि जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे. या जातीच्या शेळ्या बांध्याने मजबूत असून मध्यम आकाराच्या असतात. रंग फिकट तपकिरी असून त्यावर गडद रंगाचे मोठे ठिपके असतात.शिंगे मध्यम असून मागे वळलेली असतात. नराचे वजन ५० किलो तर मादीचे वजन २५ किलो असते.

सिरोही ( अजमेरी)

  1. जमनापरी
    हि जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि चंबळ नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते. उत्तम दूध व मांसासाठी ही जात प्रसिद्ध आहे. या जातीच्या शेळ्या दणकट, चपळ, देखण्या,उंच व रंगाने पांढऱ्या, पिवळसर असतात. या जातीच्या नराचे वजन ६० ते ९० किलो व मादीचे वजन ५० ते ६० किलो असते. एका वेतात ( ३०५ दिवसात) शेळी ६०० लिटर दूध देते. या जातीमध्ये एकावेळी दोन करडे देण्याचे प्रमाण आहे.

जमनापरी

  1. कोकण कन्याल

स्थान :कन्याल जातीच्या शेळ्या ह्या कोकणातील(मुंबई विभाग) समुद्ग किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, लिल्हा म्हणून ह्या प्रसिध्द आहे. आणि त्या भौगोलिक हवामानामध्ये ह्या शेळ्या वाढतात.

कोकण कन्याल

रंगः- वरच्या जबड्यावर पांढरा रंगचे पट्टे आढळतात.
पायः- लांब, पायावर काळा पांढरा रंग आढळतो. पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात.

  1. बीटल

बीटल

शेळीला आपण भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतो. कमी पावसाच्या प्रदेशात, निकृष्ट चाऱ्यावर तग धरून शेळ्या उत्तम प्रकारे स्वतःचे संगोपन करत असतात. कमी आर्थिक गुंतवणूक करून शेळीचे संगोपन करता येते.

  • शेळ्याचे मुळस्थान पंजाबमधील गुरुदास हे आहे.
  • ही शेळी दुधासाठी चांगली मानली जाते.
  • या शेळ्या आकाराने मोठ्या असतात.
  • यांचा रंग काळा असून अंगावर पांढऱ्या रंगाचे धब्बे असतात.
  • कान लांब लटकलेले असतात आणि आत वाकलेले असतात.
  • मादीचे वजन  ४० ते ५० किलो व नराचे वजन  ५० ते ८० किलो असते.
  • एका वेतातील दूध उत्पादन ५ ते ७ लिटरपर्यंत जाते.
  • ही शेळी बंदिस्त पद्धतीसाठी योग्य आहे.

 

  1. आफ्रिकन बोअर

आफ्रिकन बोअर

 

  • आफ्रिकन बोअर या जातीची शेळी दक्षिण आफ्रिकेत १९०० व्या शतकात खास मांस उत्पादनासाठी विकसित केली गेली.
  • बोअर शेळीची वैशिष्ट्ये
  • या जातीच्या शेळ्यांचे शरीर पांढरे मात्र डोके लाल असते. –    शेळ्यांचे कान लांब असून ते लटकल्यासारखे भासतात.
  • या शेळ्यांची शिंगे जाड असून मागे वक्र होत गेलेली असतात. –    डोळ्यांचा रंग तपकिरी असतो.
    • पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यांचे वजन ४५ किलोपेक्षा अधिक असते, नराचे वजन ७० किलोहून अधिक असते.
    • या जातीच्या शेळ्यांच्या वजन वाढीचा दर १५० ते १७० ग्रॅॅम प्रती दिवस असतो.
    • नरांचा उपयोग प्रजननासाठी किंवा मांसासाठी तर मादीचा उपयोग प्रजजनासाठी केला जातो.
    • यांचा फक्त वाढीचा दर जास्त नाही तर त्यांच्या प्रजननाचा दर देखील जास्त आहे.
    • बोअर यांचे सरासरी आयुष्य आठ ते बारा वर्षे असते.

शेळीपालन  चारा  व्यवस्थापन :

शेळीच्या जीवनसत्त्वाची गरज हि त्यांचे वयवजन, त्यांची गाभण किंव्हा व्यायालेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवर आवलंबून असते. वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांची जीवनसत्त्वाची गरज पूर्णपणे वेगळी असते. जीवनसत्वांमध्ये प्रथिनेकर्बोदकेफॅटव्हिटॅमिन्समिनरल्सपाणी,हे घटक येतात.

चाऱ्याचे प्रकार

 १ ओला चारा-

  • दशरत गवत
  • मका
  • सुबाभूळ, शेवगा
  • आफ्रिकन रेड नेपिअर (Africans red Napier),
  • स्मार्ट नेपियर (smart Napier), 4Gबुलेट (4G bullate),
  • 5Gअमेरिकन मका गवत (Americans 5G maca grass)

 

 २ सुखा चारा-

  • सोयाबीन भुसा(कुटार),
  • हरभरा भुसा,
  • गहू भुसा,
  • ज्वारी कडबा.

 

३ भरडा (खुराक/feed formulation)

  • गहू भरडा,
  • मका भरडा,
  • हरबरा चुरी,
  • खायचा सोडा,
  • गुल,
  • मीठ,
  • मिनिरल मिक्सचर या सर्व बाबी एकत्र करून सकाळी द्यावे.

यामाध्ये उन्ह्याळ्यात जर पाण्याची अडचण असल्यास  वरील हिरव्या चाऱ्याचा मुरघास करून साठऊन उन्हाळ्यात कमी अंत येईल.

तसेच नावीन्य म्हणून अझोला ह्या शेवाळ वर्गीय गवताचा व हायड्रोफोनिक गवताचा(ट्रे मध्ये उगवलेले गावत प्रामुख्याने मक्का)  सुद्धा वापर सोईस्कर होईल.

 

लसीकरण(Vaccination) वेळापत्रक   

लसीकरण शेळीचे वय कालावधी  लसीकरण लसीकरणाचा महिना
पी. पी. आर. ३ महिने वय दर तीन वर्षाला जून
लाळ्या खुरकत ३ ते ४ महिने वय प्रत्येक ६ महिन्याच्या अंतराने नोव्हेंबर
देवी   ३ ते ४ महिने वय रोग प्रदुर्भव असल्यास दरवर्षी जानेवारी
आंत्रविषार   ३ ते ४ महिने वय आणि १४ दिवसांनी परत वर्षातुंन एकदा जुलै
घटसर्प    ३ ते ४ महिने वय वर्षातुंन एकदा मे

 

 

जंतनाशक(Deworming): शेळ्यांच्या पोटातील जंत होणे हे एकदम साहजिक बाब आहे तसेच वेळेवर जंत नाशकांचा वापर न केल्यास शेळ्यांची वाढ खुंटणे,पाय लहान होणे,पोट फुगून दिसणे,जंतांची संडास लागणे ह्यासारख्या अनेक अडचणी येतात त्यामुळे जंत नाशक लसीकरण प्रमाणेच वेळेवर द्यावे व त्याचीही नोंद ठेवावी.

जंत नाशक हे प्रामुख्याने सकाळी उपाशी पोटी द्यावे तसेच दिल्या नंतर शेल्यास एक तास काहीही खायला घालू नये.

  • नवजात पिल्लाना जन्मल्याचा ३० (एक महिनना )दिवसांनंतर जंत नाशक त्यांच्या वजना नुसार द्यावे. तसेच पुढील तीन महिना देत राहावे.
  • प्रौढ शेळी अथवा बकऱ्यास दार दोन महिन्याला जंत नाशक त्यांच्या वजन नुसार द्यावे.
  • गाभण असलेल्या शेळीस fenbendazole हे जंत नाशक द्यावे .

 

गोठ्यातील गोचीड,पिसवा,बरटे,माशी,गोमाशी ययांचे व्यवस्थापन देखील अतिशय महत्वाचे आहे. हे कीटक परडेल्टाडेल्टा पोषी असून हे जनावरांचे रक्त पिऊन जगात असल्यामुळे ह्यांच्या प्रादुर्भावाने शेळ्यांची वाढ खुंटणे,वजन कमी होणे,केस गाळाने,त्वचेवर चट्टे पडणे,वारंवार भिंतीला अंग घासणे सारखे प्रकार घडतात. त्यामुळे गोठ्याला(शेड) साईफार्मिंथ्रीन/डेल्टामिथ्रिन/याअमित्रझ ह्या कीटक नाशकांचा फवारणी करावी व श्यक्य शल्यास शेळ्यांना ह्या अवषेधाच्या पाण्यात बुडून काढावे,पिल्लाना tick ची साबण ने धून काढावे वा रक्षक पावडर चा वापर करावा, शेड ला चुन्याची लक्ष्मण रेखा मारावी जेणे करून बॅहॅलील जंतू शेड मध्ये येणार नाहीत.

1 thought on “शेळीपालन(Goat Farming)”

Leave a Comment

Exit mobile version