शासन देत आहे या शासकीय योजना साठी ,खाद्य प्रक्रिया उद्योगास 35% अनुदान.

Spread the love

 

The government provides a 35% subsidy for the food processing industry under the scheme titled शासन देत आहे या शासकीय योजना साठी.

The government is providing a 35% subsidy to the food processing industry under the scheme titled शासन देत आहे,खाद्य प्रक्रिया उद्योगास 35% अनुदान. This initiative aims to support and promote the food processing sector by offering financial assistance. The subsidy is a significant incentive for businesses operating in this industry, contributing to its growth and development.

PMFME(Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing  Enterprises)

भारतीय खाद्य प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी भारतीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयाने,वोकाल फॉर लोकल या ब्रीद वाक्या प्रमाणे स्वदेशी खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी PMFME ही योजना राबावत आहे.चला जाणून घेऊयात PMFME या शासकीय योजने बद्दल माहिती.

ज्यात शासन देत आहे,खाद्य प्रक्रिया उद्योगास 35% अनुदान.

 वर्ष 2020 मध्ये  2020-21 ते 2024-25 अशी पंचवार्षिक योजना लागू करण्यात आली आहे,ही योजना मुख्यत्वे  असंघटित खाद्य/अन्न प्रक्रिया उद्योजक,MICRO ENTERPRISES(लघु/सुक्ष्म उद्योग) वाढवणे,FPO(शेतकरी उत्पादक कंपनी) तसेच SHG(स्वय:सहाय्यता गट)  यांना सहाय्यक म्हणून राबविण्यात येत आहे.

अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया(Food Processing) अंतर्गत उद्योग 👇

  1. 1) बेकरी उद्योग
    2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग
    3) बिस्किट निर्मिती उद्योग
    4) पोहा निर्मिती उद्योग
    5) काजू प्रक्रिया उद्योग
    6) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग
    7) केक निर्मिती उद्योग
    8) चॉकलेट निर्मिती उद्योग
    9) कोकोनट मिल्क पावडर निर्मिती उद्योग
    10) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग
    11) दलीया निर्मिती उद्योग
    12) डाळमिल
    13) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग
    14) पिठाची गिरणी
    15) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग
    16) फ्रुट ज्युस निर्मिती उद्योग
    17) अद्रक – लसुण पेस्ट निर्मिती उद्योग
    18) ग्रेप वाईन निर्मिती उद्योग
    19) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी तेल निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)
    20) हिंग निर्मिती उद्योग
    21) मध निर्मिती उद्योग
    22) बर्फाचे तुकडे निर्मिती उद्योग
    23) आइस क्रिम कोन निर्मिती उद्योग
    24) आयोडिनयुक्त मिठ निर्मिती उद्योग
    25) जैम व जेली निर्मिती उद्योग
    26) लिंबू शरबत निर्मिती उद्योग
    27) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग
    28) सीलबंद पाणि उद्योग
    29) पाम तेल निर्मिती उद्योग
    30) पनीर/चिज निर्मिती उद्योग
    31) पापड निर्मिती उद्योग
    32) पास्ता निर्मिती उद्योग
    33) लोणचे निर्मिती उद्योग
    34) आलू चिप्स निर्मिती उद्योग
    35) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग
    36) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग
    37) सोया चन्क निर्मिती उद्योग
    38) सोया सॉस निर्मिती उद्योग
    39) हळद / मसाले निर्मिती उद्योग
    40) शुगर कँडी निर्मिती उद्योग
    41) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे निर्मिती उद्योग
    42) इम्लीपल्प निर्मिती उद्योग
    43) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग
    44) चेरी(टूटी फृटी)निर्मिती उद्योग
    45) विनेगर निर्मिती उद्योग

सदर उद्योगांकरिता 35% अनुदान उपलब्ध आहे.

इच्छुक लाभार्थी यांनी आपआपली आवश्यक कागदपत्रे खाली दर्शवलेल्या संसाधन व्यक्ती यांच्याकडे जमा करावी.अथवा केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in  संकेतशाळवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

तुमचा बँकेचा प्रस्ताव संबंधित संसाधन व्यक्ती तयार करतील.
तसेच उद्योग स्थापनेबाबत मार्गदर्शन करतील.
उद्योग स्थापन झाल्यावर अनुदान प्रस्ताव तयार करून अनुदान तुमच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करतील.

जर वरील यादी पैकी कोणताही उद्योग आधीच अस्तित्वात व वापरात असेल तर, त्या उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी अर्ज करता येईल व विस्तारीकरण पूर्ण केल्यानंतर अनुदान सुध्दा भेटेल.

कोण लाभार्थी होऊ शकतात. 

1) वैयक्तिक लाभार्थी
(शेतीची अट नाही)
2) स्वय:सहाय्यता गट,महिला व पुरूष गट(SHG)
3) शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)
4) भागीदार संस्था

  • आवश्यक कागदपत्रे

1) PAN Card
2) आधार कार्ड
3) लाइट बिल
4) बँक पासबुक
5) मशिनचे कोटेशन
6) ज्या जागेवर उद्योग चालू करणार तेथील GPS चा फोटो

अधिक माहितीसाठी जिल्हा संसाधन व्यक्ती
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, यांच्याशी संपर्क साधणे.

Exit mobile version